नागपूर,
Saraswati Vidyalaya Shankarnagar दक्षिण भारतीय शिक्षण संस्था संचालित सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शंकरनगर येथे मराठी अभिजात भाषा सप्ताहाचा समारोप उत्साहात झाला. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित सप्ताहात प्रश्नमंजुषा, म्हणी पूर्ण करा, शब्दशोध, खजिना शोध, नाटिका आणि कविता सादरीकरण अशा विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून भाषा संचालनालयाचे अधीक्षक संजय गोरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन आणि दैनंदिन व्यवहारातील वापराचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश यांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून वाचन व लेखनाची आवड जोपासावी, असे आवाहन केले.यावेळी उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक राहुल घोडे, शैलेंद्र ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनघा पेंडके यांनी केले, तर आभार अश्विनी कुरळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागप्रमुख आसावरी मास्टे, वैभव कुंभरे, निलेश धवड व शिक्षकवृंदाने सहकार्य केले.
सौजन्य:अनघा पेंडके,संपर्क मित्र