अनोळखी नंबरवरून फोन कोण करतोय? आता रिंग वाजताच कळणार

१ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू होणार

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
new-rule अनोळखी नंबरवरून येणारे फोन कॉल हे अनेकदा कटकटीचे ठरतात. कधी स्पॅम तर कधी नको
असलेल्या व्यक्तींचे फोन नाव दिसत नसल्याने असे फोन कॉल उचलावे लागतात. कधी कधी
आपल्याच ओळखीची व्यक्ती तिच्याकडील नव्या नंबरवरून फोन करते तेव्हा आपला गोंधळ उडतो.
मात्र आता असं काही होणार नाही. त्याचं कारण म्हणजे आता मोबाईलची रिंग वाजताच
कुणाचा फोन आला आहे हे आपल्याला कळणार आहे. याबाबत सरकारने एक नवा नियम बनवला आहे.
 

phone ring 
केंद्र सरकारने बनवलेल्या या नियमानुसार येत्या १ नोव्हेंबरपासून सर्व मोबाईलवर ग्राहकांना
कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव दाखवण्याची सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे. या नव्या
नियमानुसार मोबाईलची रिंग वाजल्यावर केवळ फोन करणाऱ्याचा क्रमांकच नाही तर फोन
करणाऱ्याचं नावही दिसणार आहे. यासाठी दूरसंचार विभागाने फोन करणाऱ्याच्या ओळखीशी
संदर्भातील एका मोठ्या नियमात बदल केला आहे.
यासंदर्भात १३ ऑक्टोबर रोजी आदेश देण्यात आले आले होते. त्यानुसार नवा नियम १ नोव्हेंबर
२०२६ रोजी लागू होतील. या नव्या नियमानुसार फोन करणाऱ्याच्या नंबरसह सब्स्क्रायबर
रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेलं नावसुद्धा माहितीमध्ये दाखवलं जाईल. तसेच हा आदेश सर्व
टेलिकॉम कंपन्यांना लागू करण्यात आला आहे.

कसं काम करेल ही व्यवस्था?
जेव्हा कुठला फोन येईल, तेव्हा फोनच्या स्क्रीनवर केवळ नंबरच नाही, तर कॉल करणाऱ्या
व्यक्तीचं किंवा कंपनीचं नावही दिसणार आहे. यामुळे तुम्ही फोन करणाऱ्याचं नाव पाहून फोन
उचलायचा की नाही, याचा निर्णय घेऊ शकाल. विशेषकरून कमी शिकलेले आणि वयोवृद्ध लोक
बऱ्याचदा अनोळखी नंबर उचलतात आणि बोलतात. त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त ठरणार
आहे. ही सुविधा २जी आणि ३जी नेटवर्कवर उपलब्ध राहणार नाही. मात्र ४जी आणि
त्यावरच्या नेटवर्कमध्ये ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध असेल.
मात्र केवळ नाव दिसल्याने स्पॅम आणि स्कॅम कॉल ओळखण्यासाठी मदत होईल . मात्र याचा अर्थ
समोरून येणारे सर्व कॉल सुरक्षित असतील असे नाही. बऱ्याचदा असा फ्रॉड मंडळींकडून नाव
बदलून किंवा ओळख लपवून फोन करतात. त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन कॉल्सवर
बोलताना कधीही वैयक्तिक माहिती देऊ नका.