मुंबई,
aadi-anant-music-launch-ashok-sarafनुकतंच मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि कवी मनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या एका सिनेमाचं पोस्टर समोर आलेलं. हे पोस्टर अल्पावधीतच व्हायरल झालं असून प्रेक्षकांना खूप आवडलेलं. पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसत होतं. एका व्यक्तीच्या कुशीत दुसर्यानं विसावलेलं हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं.
पोस्टरमध्ये अशोक सराफांच्या कुशीत संकर्षण कऱ्हाडे विसावल्याचं पाहायला मिळालेलं. या सिनेमाचं नाव 'आदि अनंत'. या सिनेमातून मराठीतले दोन लोकप्रिय अभिनेते एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत. या सिनेमात अशोक सराफ आजोबांच्या भूमिकेत, तर संकर्षण कऱ्हाडे नातवाच्या भूमिकेत दिसणार आहे. नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यातला अशोक सराफांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
'आदि अनंत' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात सिनेमातलं राहुल देशपांडे यांचं 'दिगंबरा दिगंबरा' गाणं प्रदर्शित झालं. म्युझिक लाँचला चित्रपटातील कलाकार अशोक सराफ, संकर्षण कन्हाडे आणि सखी गोखले यांनी हजेरी लावलेली. पण, या सोहळ्यात अशोक सराफांचं असं काही रुप अनुभवायला मिळालं, जे यापूर्वी कुणीच पाहिलं नसेल. या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात अशोक सराफ यांनी चक्क तबला वाजवल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
'आदि अनंत' सिनेमाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यातला अशोक सराफांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या सिनेमातलं 'दिगंबरा दिगंबरा' गाणं राहुल देशपांडे यांनी गायलंय. या सोहळ्यात राहुल देशपांडे मंचावर हे गाणं गुणगुणतात आणि सोबतीला अशोक सराफ तबल्यानं साथ देतात. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. उतारवयातही अशोक मामा तितक्याचं आत्मविश्वासानं आणि आवडीनं आपलं काम करतात, याचं चाहते कौतुक करत आहेत. अशातच, राहुल देशपांडेंसोबतच्या जुगलबंदीत अशोक मामांनी तबल्यानं दिलेली साथ अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.