धनवटे नगर विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी!

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पुरस्कार

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
नागपूर,
achievement by Dhanwate Nagar Vidyalaya दीनदयाल शोध संस्थानच्या ‘बालजगत’तर्फे आयोजित ‘श्रद्धेय ताई सुकळीकर बालविकास सप्ताह २०२६’ अंतर्गत झालेल्या स्वर्गीय लच्छु भैया खडक्कार स्मृती आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथील विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार मिळवला. विद्यालयातील नववीच्या वर्गात शिकणारे धरविज वट्टीघरे आणि महेक दुबे यांनी प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर ही कामगिरी केली.

shanwate 
लक्ष्मीनगर येथील बालजगत येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे रवींद्र कौर सेठी आणि भूपेश गोमासे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील यशामुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला प्रोत्साहन मिळाले असून विद्यालयाच्या शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांतील कामगिरीतही भर पडली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी यावलकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. नागपूर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्या माधुरी यावलकर, पर्यवेक्षिका सुषमा पंचभाई आणि हायस्कूल प्रभारी कीर्ती बल्की यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.