वेळ आल्यास ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |

 

वॉशिंग्टन

donald-trump इराणला शरण आणण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करण्याची कोणतीही योजना नाही. अणुबॉम्बशिवायच त्यांना अमेरिकेच्या अटी मान्य कराव्या लागेल. अमेरिकी सैन्य इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधा, ऊर्जा प्रतिष्ठान आणि अणुठिकाणांवर नवीन हल्ल्यासाठी पर्यायाचा विचार करत आहे. यात ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’च्या वापराचा समावेश असेल. मात्र ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अणुब़ॉम्ब नाही, तो एका लहान अणुबॉम्बसारखा आहे आणि त्याचा वापर करणे अखेरचा पर्याय राहणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सागितले.

 
trump
इराणविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याची शक्यता फेटाळून लावताना ट्रम्प म्हणाले, लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बचा वापर करण्याची गरज नाही. ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ हा शेवटचा पर्याय असेल आणि तो अणुबॉम्ब नाही. मी लष्कराला पुढील हल्ल्यांची योजना विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. यात इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि पिकॅक्स माउंटनसारख्या अणुठिकाणांवर अधिक शक्तिशाली बॉम्बचा वापर करण्याचा समावेश आहे. मध्यावधी निवडणुकांपूर्वी किंवा नंतर यावर अंमलबजावणी करण्याची योजना आहे. इराणने तातडीने अमेरिकेच्या अटी मान्य करून विध्वंस टाळण्याचा मार्ग अवलंब करायला हवा. अन्यथा त्यांची ऊर्जा ठिकाणे आणि पायाभूत सुविधा काहीही सुरक्षित राहणार नाही.


अणुशस्त्रांत अमेरिका अव्वल

ट्रम्प म्हणाले, अण्वस्त्राच्या बाबतीत अमेरिका जगातील सर्वांत मोठी शक्ती आहे. रशिया आणि चीन आमच्यापेक्षा खूप मागे आहे. पण, ते पाच वर्षांत आमची बरोबरी करतील, ही खूप दुःखद बाब आहे. अणुनिःशस्त्रीकरणासाठी रशिया, चीनशी वाटाघाटी सुरू आहे. इराणला अणुशस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याचा आपला निर्धार व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुसुविधांचे आधीच नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे कधीही अण्वस्त्र असू नये याची आम्ही खात्री करू इच्छितो. त्यांचा अणुऊर्जा प्रकल्प ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. आता आम्ही पिकॅक्स माउंटनवर लक्ष ठेवून आहोत.


इराणशी संबंधित १० संस्थांवर निर्बंध

अमेरिकेने शुक्रवारी इराणशी संबंधित १६ व्यक्ती आणि १० संस्थांवर नवीन निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले. इराणचे कथित ‘शॅडो बँकिंग’ नेटवर्क, तेल व्यापार आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार विस्कळीत करणे या निर्बंधाचा उद्देश आहे. लष्करी व प्रादेशिक प्रॉक्सी गटांना निधी पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांना विस्कळीत करण्यासाठी नवीन निर्बंधाचा निर्णय घेतल्याचे स्कॉट बेसेन्ट यांनी सांगितले.

अमेरिकी डॉलर्स उपलब्ध केल्याचा आरोप

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने निर्बंध लादलेल्या संस्थांवर इराणला वित्तीय सेवा पुरवल्याचा आणि अमेरिकी डॉलर्स उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला आहे. या संस्थांचे इराकमधील इराणी सरकारी संस्था आणि इराणसमर्थित मिलिशिया गटांशी संबंध आहेत. या निर्बंधांमध्ये इराणस्थित जझीरेह इंटरनॅशनल बँक आणि चाबहार इंटरनॅशनल बँक ओव्हरसीज कंपनीचाही समावेश आहे. एका गुप्त बँकिंग नेटवर्कद्वारे इराणी तेल विकण्यास आणि त्यातून मिळालेला पैसा इराणला परत पाठवण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप बेसेन्ट यांनी केला.