नागपूर झोनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देवरीच्या फार्मसी कॉलेजचा दरारा

दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
देवरी,
pharmacy-college-from-deori डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत आयोजित नागपूर झोनल थलेटिक्स क्रीडा स्पर्धेत येथील छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्याथ्र्यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. ६० महाविद्यालयांच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत आठ पदकांची कमाई करीत विद्याथ्र्यांनी महाविद्यालयासह देवरीच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला.
 
 
pharmacy-college-from-deori
 
१५ ऑक्टोबर रोजी साकोली येथील कारंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झालेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी. फार्मसीच्या विद्याथ्र्यांनी कौशल्य, वेग आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पध्र्यांना मागे टाकले. यात मुलांच्या भालाफेक स्पर्धेत कुणाल आर. वालदे याने प्रथम क्रमांक गाठून सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या ४/१०० मीटर रिले शर्यतीतही देवरीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत दुसरे सुवर्णपदक पटकावले. या संघात वैभव पाडोती, विक्रांत गुरनुले, प्रणय धोमणे आणि पवन बिनझाडे यांचा समावेश होता. मुलींच्या भालाफेक स्पर्धेत प्राची आर. सोनुले हिने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले, तर थाळीफेक स्पर्धेत दिव्या एम. खोटेले हिने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक जिंकले.
 
 
धावण्याच्या स्पर्धांमध्येही महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैभव बी. पाडोती याने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक, तर २०० मीटर स्पर्धेत पवन एस. बिनझाडे याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रेया वैद्य हिने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोरब मुलींच्या ४/१०० मीटर रिले शर्यतीत भाग्यश्री येरणे, हिमांशी शहारे, पूनम नागरीकर आणि रियांशी धोमणे यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ४/४०० मीटर रिले शर्यतीत हिमांशी शहारे, यशस्वी लांजेवार, प्रियांशी धोमणे आणि प्रतीक्षा शहारे यांच्या संघानेही द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, सचिव अनिलकुमार येरणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उपदेश बी. लाडे यांनी विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.