बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालटाचा प्रयत्न?

राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Rajnath Singh launches an all-out attack देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांवर केला आहे. लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि तिच्या राजकीय मित्रपक्षांवर निशाणा साधला. बांगलादेशच्या धर्तीवर भारतातही सत्तापालट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, देशात अस्थिरता निर्माण करणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याचे ते म्हणाले. लोकशाही व्यवस्था अराजकतेच्या माध्यमातून चालत नसते, हे राहुल गांधी यांनी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
st578
दिल्लीतील अलीकडील घटनांचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी काँग्रेस आणि तिच्या सहकारी पक्षांवर तरुणांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीसाठी करण्याऐवजी राजकीय संघर्षासाठी केला जात असल्याचा आरोप केला. तरुणांना अराजकतेच्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, काही नेत्यांकडून बांगलादेशमधील सत्तापालटाचा संदर्भ दिला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकार उलथवून टाकण्यासंदर्भातील वक्तव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते, सत्तापालटासारख्या शब्दांचा वापर हा निवडणूक सुधारणा, एसआयआर, ज्ञानेश कुमार किंवा तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांपेक्षा देशात अस्थिरता निर्माण करून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांचे संकेत देतो.
 
 
लोकशाहीच्या नावाखाली घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा देशाच्या विकासात अडथळे निर्माण करणे योग्य नसल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील टिप्पणीचाही त्यांनी यासंदर्भात उल्लेख केला. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी कायद्याचा आदर करणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनमताचा सन्मान करण्याचे आवाहन केले. लोकशाहीचे रक्षण करण्याच्या नावाखाली विघातक राजकारण करण्याऐवजी आपल्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांना दिला.