म्हैसूर
horrific accident कर्नाटकातून पहाटेच्या निरव शांततेत भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकची प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बंगळूरुहून कोझिकोडला जाणाऱ्या प्रवासी बसला म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापट्टणा येथे पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. तसेच अपघातामध्ये बस चालक सुनील आणि वाहक सुनद या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तर बसमधील प्रवासी आफताब या प्रवाशाचा मृत्यू झाला हा प्रवासी केरळमधील कोझिकोडचा रहिवासी होता. तर एका मृताची ओळख पटली नाही.
जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात घडला त्यावेळेस प्रवासी झोपेत होते. अपघातामध्ये जखमी झालेल्या ३१ प्रवाशांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी प्रवाशांवर सध्य वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.