सागवान तस्करी करणार्‍या तिघांना अटक

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
धानोरा,
three-arrested-for-teak-smuggling चातगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने एका कारवाईत अवैध सागवान साठा जप्त केला असून, या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के व त्यांच्या कर्मचार्‍यांनी हरिदास मडावी यांच्या कारवाफा येथील शेतात धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोक्यावर सागवानाचे लठ्ठे, चिरान, आरा, सांगड, कानस आणि लपवून ठेवलेले साग वनोपज व आरा रस्सी आढळून आले.
 
 
three-arrested-for-teak-smuggling
 
हरिदास मडावी यांच्या चौकशीदरम्यान सदर साग आणणारे सौरभ मडावी व मुकुल मडावी यांची नावे समोर आल्याने त्यांनाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले. सदर माल जप्त करण्यात आला असून, या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे व गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.