हिंगणघाट कृउबात सोयाबीनची विक्रमी आवक

पाच वर्षात झाली नाही एवढी प्रचंड आवक

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
हिंगणघाट, 
wardha-soybean-price-surgeयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पाच वर्षात झाली नाही एवढी प्रचंड आवक सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात झाली आहे. हमी भावापेक्षा हजार ते बाराशे अधिक दर मिळत असल्याने येथे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून येतं आहे.
 
 
soya
 
मागील आठवड्यात सोयाबीनला ७१८५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आधारभूत किंमत ५८०७ आहे. सोयाबीनचे भाव सतत वाढत असून ८-१० दिवसात ८०००रुपयांपर्यंत सोयाबीनचे भाव जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातूनच नव्हे तर चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे.
 
सोयाबीनचा कापनी हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू झाला. या हंगामात सोयाबीच्या पेरणीपासून कापणीपर्यंत आवश्यक टप्प्यावर पावसाने कृपादृष्टी दाखविल्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक असल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रात बर्याच जिल्ह्यात उत्पन्नात मोठी घट झालेली आहे आणि सोया पेंड खाद्य तेलाची मागणी उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सध्या सोयाबीच्या भावाला फार मोठी सोया पेंड व तेलाची मागणी वाढल्यामुळे व अनियमित पावसाचा मुख्य पीक असलेल्या कापसाला फटका बसल्या मुळे आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सोयाबीन विकणे हाच पर्याय असल्यामुळे स्थानिक बाजार समितीमध्ये शासनाने निश्चितच केलेल्या आधारभूत भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे येथील बाजार समितीमध्ये सरासरी २० ते २५ हजार क्विंटल आवक होत आहे. ही आवक मागील १० वर्षांची आकडेवारी पहाता विक्रमी आवक असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. येथील दर समाधान कारक असल्यामुळे आवकीचा ओघ राहील असे जाणकाराचे मत आहे.
 
बाजार समितीची व्यवस्थाही महत्त्वाची : ॲड. कोठारी
हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा व मिळत असलेल्या तात्काळ चुकाऱ्यामुळे शेतकरी या बाजार समितीला प्रथम प्राधान्य देत आहेत. बाजार समितीनेही शेतकरी हिताच्या विविध योजना सुरू केल्या. त्याचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी दिली.