दहावीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

वर्गमित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
rape under pocso act दहावीत शिकत असताना मुलाची आणि मुलीची मैत्री झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनी गर्भवती राहिली आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या बाळ आणि मुलीची प्रकृती चांगली असून या प्रकरणी कायद्यानुसार पोलिसांनी विद्यार्थ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
 

16-year-old class 10 student gives birth in nagpur, classmate booked for rape under pocso act 
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एका हिंदी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. वर्गात शिकत असताना दोघांचे सूत जुळले. शाळेला सुटी मारुन दोघेही फिरायला जात होते. तसेच मुलगा हा मुलीला घरी नेत होता. २७ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही आरोपीने अनेकदा तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. काही काळानंतर मुलगी गर्भवती झाली. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी तिने बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत कलम ४ आणि ६ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही कुटुंबीय चिंतेत
आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी  rape under pocso act  दोघेही आईवडिल झाले. मुलगी बाळासह तिच्या आईवडिलांकडे राहत आहे तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. दोघेही अल्पवयीन आणि विद्यार्थी दशेत आहेत. त्यामुळे मुलगा आणि मुलीचे पालक सध्या चिंतेत आहेत.