जेईईच्या तयारीसाठी आकाश इनव्हिक्टस इंजिनिअरिंग 2.0 लॉन्च

जेईई मेन, ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांसाठी विशेष शैक्षणिक रचना

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
aakash-invictus-engineering-2आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आकाश इनव्हिक्टस – इंजिनिअरिंग 2.0’ हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड, बिटसॅट आणि राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम कामगिरी करता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 

aaksh 
इनव्हिक्टस 2.0 हा सहा प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. यामध्ये निकालकेंद्रित अध्यापन, अनुभवी शिक्षक, संशोधनाधारित अभ्यास साहित्य, प्रगत चाचणी प्रणाली, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे पारदर्शक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
 
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संकल्पनांचे सखोल ज्ञान, नियमित सराव, उजळणी आणि परीक्षांमधील कामगिरीचे विश्लेषण यावर विशेष भर दिला जाणार आहे. चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बलस्थाने, त्रुटी आणि सुधारणेची क्षेत्रे ओळखून त्यानुसार पुढील अभ्यासाचे नियोजन केले जाईल. तसेच, जेईई प्रवेश प्रक्रियेसाठी जोसा समुपदेशन मार्गदर्शन आणि शंका निरसनाची सुविधाही उपलब्ध असेल.
 
राष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमांतर्गत एस, अचीव्हर, ॲक्सेलरेटर आणि अपेक्स अशा चार विशेष बॅचेस सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत आणि शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या बॅचेसची रचना करण्यात आली आहे.
 
लॉन्चप्रसंगी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र शेखर रेड्डी गरिसा म्हणाले की, अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम, पुस्तके आणि चाचणी प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जेईई २०२६ मधील सकारात्मक निकालांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आता देशभरातील आकाशच्या सर्व शाखांमध्ये विस्तारित करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ सध्याच्या विद्यार्थ्यांपासून होणार असून, त्यानंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या प्रणालीचा लाभ मिळेल.