नागपूर
abvp protests सिम्बॉयसिस इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटीच्या नागपूर कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीच्या धर्मांतराच्या कथित प्रयत्नांच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
विद्यार्थिनीच्या संदर्भातील या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत सिम्बॉयसिस प्रशासनाचे प्रतिनिधी घटनास्थळी आले. त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आश्वासन दिल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आता विद्यापीठ abvp protests प्रशासनाच्या चौकशीतून या प्रकरणातील वस्तुस्थिती काय समोर येते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.