दुष्काळाच्या परिस्थितीत सरकार आणि भाजप संवेदनशील

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर
Ashish Shelar दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्ष संवेदनशील असून, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. गरबा उत्सवाच्या सुरुवातीला १२ लाख रुपये आणि आता २० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे. निधीची रक्कम महत्त्वाची नसून, त्यामागील भावना महत्त्वाची आहे. मात्र, ही भावना अतुल लोंढे यांना समजत नसल्याची टीका त्यांनी केली.
 
 
Ashish Shelar
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना शेलार बोलत होते. सामाजिक उपक्रम राबवताना धार्मिक भावनांचा आदर राखणे आणि त्याचवेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे, या दोन्ही आघाड्यांवर सरकार काम करत आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी न करणारे केवळ टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या अग्रिम मदतीबाबत Ashish Shelar बोलताना शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा त्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केले, हे सांगावे. शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याने काही जण अस्वस्थ होऊन टीका करत असल्याचा दावाही शेलार यांनी केला.