हिमाचल, मध्य प्रदेशसह छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
earthquakes-shimla-singrauli-ambikapurदेशात शनिवारी तीन राज्यांमध्ये भूकंपाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशातील शिमला, मध्य प्रदेशात सिंगरौली आणि छत्तीसगडमधील अंबिकापूरपासून १४० किलोमीटर उत्तर-वायव्य दिशेला भूकंप झाला.
 

himachal
 
शिमला येथील भूकंपाची तीव्रता ४.१ तर सिंगरौली आणि अंबिकापूरमधील भूकंपाची तीव्रता ३.५ हाेती़ राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३६:२७ वाजता हिमाचल प्रदेशातील शिमला येथे भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.१ नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू ३१.२९८ अंश उत्तर अक्षांश आणि ७७.५२९ अंश पूर्व रेखांश येथे होता. त्याची खोली जमिनीखाली १० किलोमीटर नोंदवली गेली. तर छत्तीसगडमधील अंबिकापूरपासून सुमारे १४० किलोमीटर उत्तर-वायव्य दिशेला भूकंपाची नोंद झाली. त्याची तीव्रता ३.५ मोजली गेली. या भूकंपाची वेळही पहाटे ४:३६:२७ वाजता नोंदवली गेली.
 
शनिवारी दुपारी मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी २:१२:३५ वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू २४.२३९ अंश उत्तर अक्षांश आणि ८२.५०२ अंश पूर्व रेखांश येथे होता. त्याची खोली जमिनीखाली १० किलोमीटर नोंदवली गेली. या भूकंपांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.