समर्थ नागरी पतसंस्थेत २.२४ कोटींची आर्थिक अफरातफर

पोलिसात तक्रार, खातेदारांमध्ये खळबळ

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे)
economic-chaos शहरात मागील ३८ वर्षांपासून कार्यरत समर्थ नागरिक पतसंस्थेत २ कोटी २४ लाख रुपयांच्या अफरातफरीने जनमन ढवळून निघाले. संस्थेचे लेखापरीक्षक मनोज बोदडे यांनी शुक्रवारी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात खळबळ उडाली असून, पतसंस्थेच्या खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या कष्टाच्या पैशासाठी शुक्रवारपासून पतसंस्थेच्या कार्यालया समोर प्रचंड गर्दी जमल्याचे दिसून येत आहे.
 

chaos
 
प्राप्त तक्रारीनुसार, पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये २ कोटी २४ लाख रुपयांची कथित अफरातफर झाल्याचा आरोप आहे. संस्थेचे सलग १८ वर्षांपासून अध्यक्षपद सांभाळणारे सुधाकर घवघवे यांच्या कार्यकाळातील व्यवहारांबाबत या तक्रारीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होईल, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यत केली आहे.
 
सामान्य नागरिक, व्यापारी आणि ठेवीदार आपल्या भविष्यातील गरजा, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच इतर आर्थिक जबाबदार्‍या लक्षात घेऊन पतसंस्थांमध्ये ठेवी जमा करतात. अशा परिस्थितीत मोठ्या रकमेच्या कथित आर्थिक अनियमिततेची बाब समोर आल्याने खातेदारांची अस्वस्थता वाढली आहे. कॅशियरच्या नियुतीसह अध्यक्ष घवघवे आणि सहकारी संचालकाच्या जबाबदारीची चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर पतसंस्थेतील आर्थिक व्यवहाराबाबत संचालकांना कधीच शंका कशी आली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
 
पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कथित आर्थिक अनियमिततेची व्याप्ती किती आहे, त्यामध्ये आणखी कोणाची भूमिका आहे का, आर्थिक व्यवहारात नेमया कोणत्या त्रुटी आढळल्या, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घवघवे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
 
खातेदारांची पैसे काढण्यासाठी गर्दी
कथित आर्थिक अफरातफरीच्या चर्चेमुळे खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, काही नागरिकांकडून ठेवींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यत केली आहे. या पृष्ठभूमीवर खातेदार पैसे काढण्यासाठी पतसंस्थेकडे गर्दी करत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती खातेदारांनी पैसे काढले, किती रकमेचे व्यवहार झाले आणि संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती काय? याबाबत संस्थेकडून अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.