मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिलीट पदवीने सन्मानित

अदानी समुहाचा पहिला दीक्षांत समारोह

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |

वर्धा,
fadnavis-d-lit-datta-meghe-universityदत्ता मेघे यांनी उभे केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार अदानी समुहाने स्वीकारल्यानंतर पहिल्या दीक्षांत समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. या मानद पदवीने सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित पदवीदान समारंभात दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या कुलपती प्रिती अदानी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
 
dlit
 
सावंगी मेघे येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारंभआज शनिवार १७ रोजी दत्ता मेघे सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. गेल्या १७ वर्षांमध्ये या विद्यापीठाचेच नव्हे तर सावंगीच्या वैद्यकीय चळवळीचे प्रणेते दत्ता मेघे यांच्याशिवाय हा दीक्षांत समारंभ झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट तर एनएमसीचे अध्यक्ष डॉ. अभिजित शेठ यांना डी. एससी या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रिती अदानी होत्या. तर अदानी समुहाचे डॉ. मलय महादेवी, विश्वस्त सागर मेघे, प्रकुलगुरू डॉ. ललीतभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे काळे पिसुळकर आदींची उपस्थिती होती.
 
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या नवनवे आजार डोकेवर काढत आहे. काही ठिकाणं मधुमेहींचे राजधानी म्हणून ओळख मिळवत आहे. यात कॅन्सरची भर पडत आहे. या आजारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य क्षेत्रात नव्या संशोधनाची गरज आहे. देशात असलेल्या वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थांनी आणि शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी नवे संशोधन करण्यावर भर द्यावा, तरच आरोग्य संपन्न समाजाची संकल्पना साध्य होईल असे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
पदकं मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुणवत्ता यादीत मुलीच आघाडीवर असल्याचे म्हणत मुलांना ’फॉलो देम’ असा सल्ला दिला. ही केवळ या एका संस्थेची नाही तर इतर संस्थांचीही स्थिती आहे. प्रत्येक संस्थेचा विचार केल्यास त्यात ७५ टक्के मुलीच आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली आघाडी ही देशाचा विकास साधल्या जात असल्याचे चिन्ह आहे. येत्या काळात हीच देशाची खरी ताकद ठरणार असल्याचे ते म्हणाले. संशोधन क्षेत्राच्या विकासाकरिता या संस्थेत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही ते म्हणाले.
 
 
एवढेच नाही तर वैद्यकीय असो वा अन्य क्षेत्र असो त्यात संकटं येणार आहेत. त्याचा सामना करण्याची शती प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःत निर्माण करावी असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यापीठाच्या कुलपती प्रिती अदानी यांनी अदानी समुह हेल्थ केअरच्या माध्यमातून स्थानिक गरजा लक्षात घेऊन काम करणार असल्याचे सांगून दत्ता मेघे यांनी उभारलेल्या शिक्षण क्षेत्राचा आवर्जुन उल्लेख केला. वर्धेतील रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय देशातीलच नव्हे तर जगातील अव्वल दर्जाचे होईल, असा विश्वास व्यत केला.