बुलढाणा
fire at bus station येथील बस स्थानकाच्या आतील प्रवेश द्वारा जवळ असलेल्या एसटी दुकान संकुलाच्या टीनपत्राच्या दुकानाला दि.१६ रोजी रात्री अचानक आग लागली अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी आग विझविली तर दुसर्या दिवशी दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी बुलढाणा चिखली मेहकर लोणार कडे जाणारी एसटी बस ने शहरातील सर्कुलर रोड वर इंजिनने अचानक पेट घेतल्याने बसला आग लागली होती वाहन चालकाच्या प्रसंगसावधनाने त्याने लगेच बस थांबून प्रवाशांना खाली उतरविले ४० प्रवासी सुखरूप बाहेर पडले.

दि. १७ ऑक्टोबर रोजी एसटी बस क्रमांक एम एच ४० वाय ५०४७ बुलढाणा बस स्थानकावरून प्रवासी येऊन दुपारी बारा वाजता निघाली त्यात ४० प्रवासी असल्याचे वाहक माधुरी सुरकर यांनी सांगितले बुलढाणा शहरात नवरात्र उत्सव असल्याने वाहतूक सर्कुलर रोड मार्गे वळविण्यात आले आहे या रोडच्या मधोमध या धावत्या बसच्या इंजिनची वायर जळाल्याने पेट घेतला अचानक धूर आल्याने वाहक शैलेश राठोड यांनी बस थांबवली प्रवाशांनी खाली उतरून बसची आग विझविली दरम्यान महामंडळाचे अधिकारी व यांत्रिक कर्मचारी घटनास्थळी हजर झाले ४० प्रवाशांना इतर बसमधून रवाना करण्यात आले सुदैवाने प्रवासी बचावल्याच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.