सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत ‘कारंजाचा राजा’ जिल्ह्यातून प्रथम

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
karanjas-king-ranks-first-in-the-district शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी श्री मराठा गणेशोत्सव मंडळाने केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये मंडळाने वाशीम जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.या उल्लेखनीय यशामुळे ’कारंजाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री मराठा गणेशोत्सव मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 
 
karanjas-king-ranks-first-in-the-district
 
विशेष म्हणजे १०२ वर्षांची परंपरा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील श्री मराठा गणेशोत्सव मंडळाचा मागील वर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला होता. यंदा मात्र अधिक जोमाने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि एकजुटीच्या बळावर प्रयत्न करत मंडळाने थेट प्रथम क्रमांकावर झेप घेतली. मागील वर्षीच्या यशापेक्षा एक पाउल पुढे टाकत जिल्ह्यात अव्वलस्थान मिळविण्याची ही कामगिरी मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि सामूहिक योगदानाची साक्ष देणारी ठरली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल श्री मराठा गणेशोत्सव मंडळाचे कौतुक होत आहे.
 
 
सन १९२४ मध्ये स्थापना झालेल्या श्री मराठा गणेशोत्सव मंडळाला १०२ वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची ममुद्ध परंपरा जपत मंडळाने आजवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक हा या परंपरेतील आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे.या यशामागे मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, मार्गदर्शक, देणगीदार, हितचिंतक आणि समस्त गणेशभक्त यांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. सर्वाच्या सहकार्याने, एकजुटीने आणि गणरायावरील अढळ श्रद्धेने हे यश साकार झाले असल्याची भावना मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. श्री मराठा गणेशोत्सव मंडळाने मिळविलेल्या या यशामुळे कारंजा शहराच्या लौकिकात भर पडली असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि सामुहिक कार्याची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मागील वर्षी द्वितीय क्रमांकावर समाधान मानणार्‍या मंडळाने यंदा प्रथम क्रमांक मिळवून यशाची नवी उंची गाठली आहे.आगामी काळातही मंडळाने आपल्या गौरवशाली परंपरेलला साजेशा कामगिरी करत यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करावीत.