पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळली;आठ जणांचा मृत्यू

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
कोटा,
kota-bus-accident-delhi-mumbai-expresswayराजस्थानच्या कोटा जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या एका अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ हून अधिक जण जखमी झाले. अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशहून जयपूरला जात हाेती़ दरम्यान, बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि ती पुलाखाली सुमारे २० फूट खोल नाल्यात कोसळली. बसमधील सर्व प्रवाशी भोपाळ व बैतुलचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

kota
 
सिमलिया पोलिस ठाण्याचे अधिकारी नंद सिंग यांनी सांगितले की, प्रवासी बसने कराडिया टोल प्लाझा ओलांडल्यानंतर सुलतानपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, बसचालकाला अचानक झोप लागली. अति वेगामुळे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. बस रस्ता दुभाजक तोडून थेट पुलातून नाल्यात कोसळली. यात बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे आतील प्रवासी गंभीर जखमी झाले़ या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. कोटा येथील भीषण अपघातानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी कठोर भूमिका घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत जखमींची भेट घेतली़ तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. संपूर्ण घटना गांभीर्याने घेत लोकसभा अध्यक्षांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.