नवेगाव बांध येथे मराठी साहित्याचा जागर

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
marathi literature मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त नवेगाव बांध येथील रुखमा महाविद्यालयाच्या सभागृहात एकदिवसीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश चव्हाण होते. उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजया दयाराम कापगते यांच्या हस्ते झाले.
 

marathi literature conference celebrates classical marathi language at navegaon bandh 
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला, तरी शैक्षणिक स्तरावर मराठी शिक्षक, प्राध्यापक आणि भाषेची होत असलेली उपेक्षा चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानने दुर्गम भागात येऊन मराठीचे महत्त्व अधोरेखित करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा. विजया marathi literature मारोतकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. विजया कापगते यांनी आयोजकांचे कौतुक केले. प्रकाशन सत्रात डॉ. अविनाश सातपुते यांच्या ‘ग सखे साजणी’ या दीर्घ काव्यसंग्रहासह विजया मारोतकर यांची ‘टेकऑफ’ ही कादंबरी, डॉ. अंजली टाकळीकर यांचे आत्मचरित्र व कथासंग्रह आणि प्रणोती कळमकर यांनी संपादित केलेल्या ‘गीताई’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. लेखक-कवींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
डॉ. भारती खापेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात सुमारे ३२ कवी-कवयित्रींनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध कविता सादर केल्या. भाऊराव पत्रे, एकनाथ बोरकर, वैशाली बोरकर, नितीन पुगलिया आणि डॉ. अरविंद बुटले यांच्यासह साहित्यिक, प्राध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.