नागपूर,
Mundle English Medium School बालजगततर्फे आयोजित स्व. लच्छुभैय्या खडक्कार स्मृती वक्तृत्व स्पर्धेत दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपूरच्या मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलच्या अनन्या मुनशी आणि आत्मजा मुनशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्राथमिक गटात इयत्ता तिसरीतील अनन्या आणि इयत्ता दुसरीतील आत्मजा यांनी प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हे यश मिळविले. त्यांना मराठी शिक्षिका कलाश्री बरडे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, मुख्याध्यापिका मंजुल मेहता, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे आणि शिक्षकवृंदाने विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
सौजन्य:निकिता कायरकर ,संपर्क मित्र