मुंडले स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी भरारी

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर
Mundle School भारत विकास परिषदेतर्फे आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपूरच्या मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर समूहगानाचे सुरेल आणि दमदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांनी विशेष दाद दिली. या यशासाठी शाळेच्या संगीत शिक्षिका राखी शिपूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
mot
 
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुल मेहता, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये आणि पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
सौजन्य :निकिता कायरकर ,संपर्क मित्र