धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मेट्रो सज्ज!

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-metro धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी (दसरा) निमित्त नागपुरात येणाऱ्या भाविक व नागरिकांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता महा मेट्रोने २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार) रोजी मेट्रो रेलच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी नागपूर मेट्रोची सेवा सकाळी ५:०० वाजता सुरू होऊन मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत अविरत सुरू राहील.
 
nagpur
 
२० ऑक्टोबर रोजी खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर या चारही टर्मिनल स्थानकांवरून पहिली मेट्रो ट्रेन सकाळी ५:०० वाजता सुटेल, तर शेवटची मेट्रो ट्रेन मध्यरात्री १२:०० वाजता सुटेल. महा मेट्रोने गेल्या २०२३ पासून (सलग ३ वर्षांपासून) अशा महत्त्वाच्या प्रसंगी नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ मेट्रो सेवा पुरवत आहे, ज्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर, लगतचे परिसर, इतर जिल्हे तसेच इतर राज्यांतून लाखो भाविक दीक्षाभूमीवर येतात. त्याचप्रमाणे विजयादशमीनिमित्त शहरातील विविध भागात होणारा रावण दहन सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. या दोन्ही मोठ्या उत्सवांमधील गर्दीचा विचार करून महा मेट्रोने २० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे.