भारतीय संस्कार, कुटुंबाची साथ हीच यशाची ताकद!

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
shruti sawalakhe आंतरराष्ट्रीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत नागपूरच्या डॉ. श्रुती नीरज सवालाखे यांनी ‘मिसेस युनायटेड नेशन्स २०२६’ हा किताब पटकावून भारताचा गौरव वाढवला. नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांना ‘मिसेस युनायटेड नेशन्स अर्थ’ या किताबानेही सन्मानित करण्यात आले.
 

nagpur 
यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना, भारतीय संस्कृती आणि कुटुंबातून मिळालेले संस्कार हीच आपल्या यशाची खरी ताकद आहे. स्पर्धेला सामोरे जाताना भारताला कायम हृदयात ठेवले, अशी भावना डॉ. श्रुती यांनी व्यक्त केली. महिलांनी विवाह आणि कुटुंबाकडे अडथळा म्हणून न पाहता, आयुष्यातील भक्कम आधार म्हणून पाहावे. कुटुंबाच्या साथीने महिलांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करता येतात, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. श्रुती या दंतशल्यचिकित्सक shruti sawalakhe आणि कॉस्मेटोलॉजिस्ट असून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी एमबीएची पदवी संपादन केली आहे. सध्या त्या नागपुरातील जय इन्स्टिट्यूट आणि भानुकृपा हॉस्पिटलच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. या प्रवासात पती डॉ. नीरज सवालाखे आणि कुटुंबीयांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेदरम्यान एका परदेशी स्पर्धकाची प्रकृती बिघडल्याने डॉ. श्रुती यांनी डॉक्टर म्हणून तिला मदत केली. मुकुटापेक्षा माणुसकी मोठी असल्याचे यातून अधोरेखित झाले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःची स्वप्ने पूर्ण करावीत आणि समाजासाठीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.