कारंजा तालुयात २६० टन सोयाबीन कुटार जप्त

१० गट्टू कारखान्यांना नोटीस

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
वाशीम,
notice-to-10-gattu-factories संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैध साठवणूक, वाहतूक व हस्तांतरण रोखण्यासाठी कारंजा तालुका भरारी पथकाने धडक कारवाई केली. कारंजा शहरातील अली नगर व एकता नगर परिसरातून २६० टन सोयाबीन कुटार जप्त करण्यात आले. तसेच तालुयातील १० गट्टू कारखान्यांची तपासणी करून उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
 

notice-to-10-gattu-factories 
 
या कारवाईत कलीम बेग रहीम बेग (रा. बिबीसा पुरा, कारंजा) याच्याकडील १५० टन, तर मुजाहिद खान मुजफ्फर खान (रा. लीलावती नगर, कारंजा) याच्याकडील ११० टन कुटार जप्त करण्यात आले. १६ व १७ ऑटोबर रोजी धनज, ढंगारखेड, कामरगाव, शिवण, खेरडा, शहा, इंझा, दोनद व गंगापूर परिसरातील गट्टू कारखान्यांना उपलब्ध कुटाराचा वापर न करण्याचे तसेच पशुधनासाठी चारा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वनवे, उद्योग निरीक्षक तेलमोरे, पोकाँ संतोष राठोड, ग्राम महसूल अधिकारी भूषण वैद्य, विनोद नागलकर व संजय सोहळे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.