पूजा मापारीने पटकावले २३ सुवर्ण पदकं

मुख्यमंत्र्यांनी भाषणात केला खास उल्लेख

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
 वर्धा, 
poojal-mapari-23-gold-medals दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोह आज १७ रोजी सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आला होतो. यावेळी पूजल मापारी या विद्यार्थिनीने शैक्षणिक सत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगीरीसाठी २३ सुवर्ण पदकं आणि ६ रोख पुरस्कार पटकावले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात पूजल मापारीचा आवर्जुन उल्लेख केला.
 

puja 
 
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (डीएमआयएचईआर) चे नाव बदलून अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (एआयएचईआर) झाल्यानंतर प्रथमच हा दीक्षांत समारंभ झाला. या दीक्षांत समारोहात दहा विद्याशाखांमधील एकूण २,३२० पदव्या प्रदान केल्या. यामध्ये १२३ पीएच.डी. पदव्यांचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी १२३ सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि १३ अन्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. ८३ गुणवंत विद्यार्थ्यांचा या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. दत्ता मेघे मेडिकल कॉलेजच्या पूजल देविदास मापारी हिने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी तब्बल २३ पदके मिळविली.
 
 
यावेळी डॉ. प्रिती अदानी यांनी अदानी उच्च शिक्षण व संशोधन संस्था हे पूर्वी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था या नावाने ओळखले जाणारे अभिमत विद्यापीठ आहे. सावंगी मेघे येथे असलेल्या या विद्यापीठात दर्जेदार शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. ‘शिका आणि नेतृत्व करा’ या ध्येयाने प्रेरित असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि प्रभावी भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करते. व्यावसायिक क्षेत्रातील यशातून समाजासाठी योगदान देणारे विद्यार्थी घडविणे, हा संस्थेचा दृष्टिकोन असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
डॉ. ललीलभूषण वाघमारे यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आलेख मांडला. विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी मंत्री हंसराज अहिर, आ. समीर कुणावार, आ. सुमीत वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, हिंदी विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू कुमद शर्मा यांची उपस्थिती होती.