रामदासपेठ दुर्गोत्सवात भाविकांची मांदियाळी

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर
Ramdaspeth Durga Utsavzरामदासपेठ सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी सुनिता पाटील यांच्या हस्ते आदिशक्ती माता दुर्गेची विधिवत महाआरती करण्यात आली.या मंगलमय सोहळ्याला सुनिता सुरेश पाटील, आकांक्षा सागर पाटील, माला गणवीर, सुरेखा उइके यांच्यासह रामदासपेठ परिसरातील नागरिक आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
hob
 
याप्रसंगी मंडळाच्या वतीने सुनिता पाटील यांना दुर्गादेवीची सुंदर प्रतिमा सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भाविकांची उपस्थिती, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सौजन्य:सुनीता पाटील,संपर्क मित्र