बोरच्या कोअर सफारीत अभिनेता सुमित राघवन यांना ‘वाघोबांचे’ दर्शन!

राणी वाघीण कॅटरीना आणि पुत्र ‘ओम’ला पाहून पर्यटकांचा आनंद द्विगुणित

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
वर्धा
safari sumit raghavan नवरात्री उत्सवाच्या उत्साहात निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातच जंगल सफारीदरम्यान वाघाचे दर्शन झाल्यास पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच काहीसा आनंद वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर जंगल सफारीदरम्यान आज शनिवार १७ रोजी सकाळी बीटीआर-३ म्हणून ओळखली जाणारी वाघीण ‘कॅटरीना’ आणि तिचा रुबाबदार पुत्र ‘ओम’ यांचे दर्शन अभिनेता सुमित राघवन यांच्यासह पर्यटकांना अनुभवायला मिळाला.
 

bor
बोर व्याघ्र प्रकल्प हा वन्यजीवप्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथील घनदाट जंगल, निसर्गरम्य वातावरण आणि विविध वन्यजीवांमुळे पर्यटकांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव मिळतो. विशेषतः वाघांचे दर्शन हे पर्यटकांसाठी नेहमीच कुतूहलाचा आणि रोमांचकारी विषय असते.
 
शनिवारी सकाळच्या सफारीदरम्यान कॅटरीना आणि तिचा ‘कब्स्’ ‘ओम’ पर्यटकांच्या नजरेस पडले. जंगलाच्या नैसर्गिक अधिवासात या दोन्ही वाघांना पाहण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वाघिणीची रुबाबदार चाल आणि तिच्या पुत्राचे देखणे रूप पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले. जंगल सफारीदरम्यान मिळालेल्या या अविस्मरणीय अनुभवामुळे पर्यटकांच्या सहलीत आणखी रंग भरले.
नवरात्रीच्या पृष्ठभूमीवर पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचे दर्शन हा एक वेगळाच आनंद देणारा अनुभव ठरत आहे.
बोरचे जंगल मनमोहक : राघवन
शनिवार १७ रोजी सकाळी बॉलिवूड सेलिब्रिटी सुमित राघवन व त्यांची चमू सफारीकरिता बोरधरण गेटमधून निघाले. दुपारपर्यंत पर्यटकांसह त्यांना कॅटरिना आणि ओम या दोन वाघाचे दर्शन झाले. सोबतच त्यांनी बोरच्या निसर्गरम्य सोबतच विविध पक्षी, प्राण्यांचेही प्रत्यक्ष अनुभव घेतले. दरम्यान, बोरचे जंगल मनमोहक आणि अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रीया बोलताना व्यत केली. यावेळी जंगल सफरनामाचे अध्यक्ष संकेत गावंडे, अनिकेत भोयर, बोरचे उपसंचालक मंगेश ठेगडी, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर, आदींची उपस्थिती होती.