सुरेश गणराज यांना उत्कृष्ट व्याख्याते पुरस्कार

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर
Suresh Ganraj महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगणा येथील एमआयए सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुरेश गणराज यांना ‘उत्कृष्ट तज्ज्ञ व्याख्याते’ आणि ‘मार्गदर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योग आयुक्तालयाचे सहायक आयुक्त एस. एस. मुदमवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
pathk
 
 
गणराज यांनी गेल्या २२ वर्षांपासून व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता आणि स्वयंरोजगार या विषयांवर मार्गदर्शन करून नवोद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली शिरसागर, पी. पी. मोहन, एच. आर. वाघमारे आणि श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.
सौजन्य:अरविंद पाठक,संपर्क मित्र