श्री विजयादशमी उत्सवानिमित्त नागपूर महानगरात तरुण स्वयंसेवकांचे पथसंचलन

संघ शताब्दी समापन वर्ष , श्री विजयादशमी उत्सवापूर्वी नागपुरात एकाच वेळी ९ ठिकाणांहून पथसंचलन, प्रचल…

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर
vijayadashami-festival राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगरातर्फे श्री विजयादशमी उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. उत्सवापूर्वी स्वयंसेवक पथसंचलन करतात. यावर्षी विशेष म्हणजे संघ शताब्दी वर्ष समापन, श्री विजयादशमी उत्सवापूर्वी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात एकाच वेळी ९ ठिकाणांहून पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत पथसंचलनाचे अवलोकन करतील.दिनांक: १८ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ७:३० वाजता . पथसंचलन अवलोकन स्थान: बाबा बुद्धाजी नगर, टेका नाका, कामठी रोड, गुरुद्वारा खालसा गेटजवळ, नायडू बंगल्यासमोर.

rss pathsanchalan

श्री विजयादशमी उत्सवानिमित्त नागपूर महानगरात तरुण स्वयंसेवकांचे पथसंचलन…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरातर्फे श्री विजयादशमी उत्सवानिमित्त तरुण स्वयंसेवकांचे पथसंचलन पूर्ण गणवेशात रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता नागपुरातील ९ विविध स्थानांवरून निघणार आहे. त्यांचे स्थान व मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
१. मोहिते भाग – कच्छी वीसा मैदान
उत्तर द्वारातून बाहेर उजवीकडे – शक्ती हार्डवेअर पासून डावीकडे – जयगोविंद अपार्टमेंट च्या समोरून – भंडारा रोड डावीकडे – शिवहरी अपार्टमेंट च्या समोरून – दानागंज चौकातून डावीकडे – श्री श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या उजवीकडे – भुणेश्वरी च्या समोरून – कल्पतरू अपार्टमेंटच्या समोरून डावीकडे व लगेच उजवीकडे स्वामीनारायण अपार्टमेंट समोरून – रीयांश अपार्टमेंटच्या उजवीकडे – सुरानी भवन च्या समोरून – गुरूछाया च्या समोरून डावीकडे – सुखमणी च्या समोरून – टेलीफोन चौकातून डावीकडे – छापरू चौकातून डावीकडे – तिवारी टालापासून उजवीकडे – अशोक एलाईट पासून उजवीकडे – दक्षिणेकडील दारातून मैदानात प्रवेश.
२. इतवारी भाग – चिटणवीस पार्क
गवळीपुरा – पत्थरफोड दरवाजा – साकोडे कंपनीच्या बाजूने – सी.ए. रोड उजवीकडे वळण – हॉटेल आमीर पासून डावीकडे वळण – नंगा पुतळा – तीन नल चौक – भारत माता चौक डावीकडे वळण – गोळीबार चौक – गांजाखेत चौक डावीकडे वळण व लगेच उजवीकडे वळून गिरीधर मेडीकल समोरून खा. कुंभारे पुतळा येथून उजवीकडे लाल ईमली चौक – डावीकडे वळण घेऊन अग्रसेन चौक – चिटणवीस पार्क चौक – उजवीकडे वळून पुन्हा उजवीकडे वळण – भारत व्यायाम शाळेसमोरील गेटने मैदानात प्रवेश.
३. लालगंज, बिनाकी, सदर भाग – एकता नगर कॉलनी मैदान
एकता नगर कॉलनी मैदानातून निघून ऑटोमेटीव्ह चौकातून उजवीकडे – गो गॅस पासून उजवीकडे गुरूद्वारा – उजवीकडे बाबा बुधाजी नगरापासून उजवीकडे महेंद्र नगर – शितला माता मंदिरासमोरून सरळ – सिमा ब्युटी पार्लर कडून डावीकडे यादवनगर भिम चौकातून सरळ – हनुमान मंदिर यादव नगर – यादव नगर पेट्रोल पंपाच्या मागून – एकता नगर कॉलनी मैदानात परत.

४. गिट्टीखदान, धरमपेठ भाग – मरारटोली मैदान
मरारटोली मैदान – सोनी सेंटर चौकातून डावीकडे – रवीनगर चौकातून डावीकडे – अग्रसेन हॉस्टेलच्या बाजूने डावीकडे – कार्पोरेशन शाळेजवळील चौकातून उजवीकडे – तेलंगखेडी मैदानाच्या बाजूने डावीकडे – सर्वेश्वर मंदिरासमोरून डावीकडे – कार्पोरेशन समोरून उजवीकडे – श्री पाठक यांच्या घरासमोरून उजवीकडे – राम मंदिरसमोरून – रामनगर चौकातून डावीकडे – पारीजात बिछायत केंद्रसमोरून शिवहरे आटा चक्की समोरून उजवीकडे – मरारटोली मैदानावर परत.
५. त्रिमुर्ती भाग – अत्रे ले आउट मैदान
अत्रे ले आउट मैदानातून उजवीकडे – चौधरी लाईफ स्टाईल – प्रताप नगर चौक – राधे मंगलम – पडोळे चौकातून उजवीकडे – चकोले एम्पोरीयम – भाग्यश्री बार पासून उजवीकडे – समर्थ व्यायामशाळा मैदान – प्रसादम पासून उजवीकडे – दुर्गा मंदिर समोरून सरळ – रसभरी जलेबी पासून डावीकडे – डॉ. हेडगेवार उद्यान – डावीकडून अत्रे ले आउट मैदानावर परत.

६. सोमलवाडा भाग – साहस क्रिकेट क्लब मैदान, छत्रपती नगर मैदान
साहस क्रिकेट क्लब मैदान, छत्रपती नगर मैदान – छत्रपती नगर चौक – रींगरोडने सावरकर नगर चौक – देवनगर चौक – साई मंदिर चौक – माधव नेत्रालय – प्रशांत नगर – छत्रपती नगर मैदानात परत.
७. अजनी भाग – कलोडे कॉलेज, जयवंत नगर
कलोडे कॉलेज – सरळ राम मेडीकल पर्यंत – डावीकडे ओंकार नगर रोड सह्याद्री लॉन – काळा मारोती मंदिर – रिद्धी सिद्धी हार्डवेअर पर्यंत – तेथून डावीकडे सरळ रस्ता टी पॉईंट एंड पर्यंत – उजवीकडे व लगेच डावीकडे – जुने अभय नगर शाखा तथा बास्केट बॉल ग्राउंड नंतर डावीकडे अभयनगर गार्डन – दुर्गा चौक बुद्ध विहार – वी राव ट्युशन पासून डावीकडे – उजवीकडे सेंट्रल रेल्वे गार्डन – सरळ रामटेके नगर रोड क्रॉस करून पुन्हा कलोडे कॉलेज मैदानात परत.
८. अयोध्या भाग – पुष्प लॉन
पुष्प लॉन – नरसाळा टॉवर लाईन रोड – नरसाळा मेन रोड – डावीकडे – गजानन क्लासेस – फीटनेस स्टार – श्री सत्य साई कॉन्व्हेंटच्या आधी डावीकडे वळून वस्ती मध्ये – वस्ती मधून नाला क्रॉस करत प्लॉट नंबर २ वरून पुष्प लॉनवर परत.

९. नंदनवन भाग – भारतीय विद्या भवन, श्रीकृष्ण नगर
भारतीय विद्या भवन गेट क्रमांक २ संचलन सुरूवात – कमल कॉन्व्हेंट शेष नगर – मिरा कलेक्शन खरबी रोड डावीकडे – गोस्वामी डेअरी समोरील – वाठोडा पांधन रोड – गोपाल कृष्ण नगर रोड – संजू टी स्टॉल डावीकडे – विद्यानगर – युवा चौक श्रीकृष्ण नगर – इंदिरा मेडीकल स्टोअर समोरून भारतीय विद्या भवन मैदानावर परत