तभा इफेक्ट
वर्धा
Durga Darshan Ticket Charges सार्वजनिक दुर्गोत्सवात सहयोग राशीच्या नावाखाली १० ते १०० रुपयांपर्यंत तिकिटांची सती केली जात असल्याचा प्रकार वर्धेत खुलेआम सुरू असल्याचे वृत्त तरुण भारतने १४ रोजी प्रसिद्ध करताच धर्मदाय आयुत कार्यालयाने दखल घेत शहरातील १० ते १०० रुपये तिकीट घेऊन देवीचे दर्शन देणार्या मंडळांचा तंबी दिली आहे. दुर्गादेवी मंडळानेही आजपासुनच पैसे घेण्यास नकार दिल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.
कृष्णनगरातील एका दुर्गा मंडळात तर १० रुपयांचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवेशच दिला जात नाही. दयालनगर येथील दुर्गा मंडळात व्हीआयपी पाससाठी ५० तर सामान्य नागरिकांना १० रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे दुर्गादर्शनासाठी आलेल्या गरीब भाविकांना देवीच्या मंडपातूनच दर्शन न घेता परतावे लागल्याची बातमी तरुण भारतमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. काही मंडळांमध्ये सहयोग राशीच्या गोंडस नावाखाली तिकीट तर कृष्णनगरातील नवरात्र दुर्गा पूजा उत्सव समिती या मंडळाने दहा रुपयांचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवेश नाही, असा कडक नियम केला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आर्वी नाका चौक परिसरातही सहयोग राशीच्या नावाखाली पैसे जमा केले होते. दुर्गादेवी मंडळांकडून दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याने सर्व सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यत केली होती. याशिवाय दुर्गा मंडळांच्या या भुमिकेमुळे हिंदू धर्मही विनाकारण बदनाम होत होता. Durga Darshan Ticket Charges जनमानसाच्या भावना लक्षात घेता तरुण भारतने १४ रोजी वृत्त प्रकाशित करताच धर्मदाय आयुत कार्यालयाने त्याची दखल घेतली. गुरुवार १५ रोजी सायंकाळी अधिकार्यांनी दुर्गादेवी मंडळांना भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांना कृष्णनगर येथील दुर्गा देवी मंडळात १० रुपये घेऊन दर्शनााठी प्रवेश दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय आर्वी नाका येथील दुर्गादेवी मंडळाने लॉटरीचे तिकीट विकरणार नसल्याचे मान्य केले. दयालनगर येथील दुर्गादेवी मंडळाने दर्शनासाठी तिकीट नाही तर देखाव्यासाठी पैसे घेत असल्याचे मान्य केले. अधिकार्यांनी तपासणी दरम्यान दुर्गादेवी मंडळांना देण्यात धर्मदाय आयुत कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या परवानगीचीही तपासणी केली. दिलेल्या परवानगीचे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली. त्यामुळे शहरात जे दुर्गादेवी मंडळ देवीच्या दर्शनासाठी तिकीट आकारत होते, हे बंद होणार आहे.