महिलांच्या प्रगतीचा मार्ग आर्थिक सक्षमीकरणातून

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
women empowerment महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक बंधने, सांस्कृतिक मूल्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत महिलांनी स्वकर्तृत्वातून प्रगती साधावी, या मुद्द्यांवर आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात विचारमंथन करण्यात आले. ‘महिलांची प्रगती आणि मर्यादा : दोन्ही महिलांमध्येच’ या विषयावर हा परिसंवाद पार पडला.
 

women empowerment and social boundaries discussed at seminar in nagpur college 
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्त्या अनघा सराफ यांनी महिलांनी बँकिंगविषयक ज्ञान, आर्थिक व्यवहारांतील जागरूकता आणि आत्मविश्वास यांच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन जीवनातील निर्णय स्वतः घेण्याची क्षमता महिलांनी विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्वाला धोटे यांनी भारतीय महिलांनी पारंपरिक मर्यादा ओलांडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केल्याचे नमूद केले. महिलांनी स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे त्या म्हणाल्या. रजनी हुट्टा यांनी महिलांची प्रगती, सामाजिक मर्यादा, women empowerment सांस्कृतिक मूल्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांविषयी विचार मांडले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे होत्या. महिलांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल राखण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाला अरुणा सबाने आणि माधुरी साकुळकर उपस्थित होत्या. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आले.