नाना मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सेवाभावी उपक्रम

महाप्रसादासाठी तयार केली ५० हजार बुंदीची पाकिटे

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
nana-mundada-vidyalaya स्थानिक मालेगाव शहरातील नाना मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या सेवाभावी वृत्तीचा व सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श प्रस्थापित केला आहे. श्री जगदंबा देवी संस्थान नागरदास (नागतास) येथे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित भव्य महाप्रसाद वाटपासाठी लागणार्‍या ११ क्विंटल बुंदीच्या प्रसादाची तब्बल ५० हजार पाकिटे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार करून दिली आहेत. या विद्यार्थ्यांच्या निस्वार्थ व सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
nana-mundada-vidyalaya
 
नवरत्रोत्सवानिमित्त श्री जगदंबा देवी संस्थानच्या वतीने दरवर्षी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादात प्रसादासोबत बुंदीचे वाटप केले जाते. या ११ क्विंटल बुंदीची पाकिटे तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ना ना मुंदडा विद्यालयाचे विद्यार्थी सन २०२१ पासून सातत्याने पार पाडत आहेत. यंदाही विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व वेळेत ही ५० हजार पाकिटे तयार करून दिली आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य दिनेश उंटवाल व सर्व शिक्षकवृंदाचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या प्रेरणेमुळे आणि विद्यार्थ्यांच्या श्रमदानामुळे हा महाप्रसादाचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. श्री जगदंबा देवी संस्थानच्या वतीने महाप्रसाद वाटपाच्या या धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने सहकार्य केल्याबद्दल नाना मुंदडा विद्यालयाच्या