कोहळेंच्या विजयासाठी भाजपाचा वर्धेत विजय संकल्प मेळावा

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
वर्धा,
bjp नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ स्थानिक हेरिटेज सभागृहात भाजपा वर्धा विधानसभा क्षेत्राच्या वतीने विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात आला.
 

bjp 
याप्रसंगी पालकमंत्री व नागपूर पदवीधर निवडणूक सह प्रभारी डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष व वर्धा विधानसभा निवडणूक प्रभारी सुनील गफाट, विधानसभा प्रभारी किशोर दिघे, विधानसभा निवडणूक नोंदणी प्रमुख प्रशांत बुर्ले, आर.पी.आय. आठवले गटाचे विदर्भ प्रमुख विजय आगलावे, वर्धा जिल्हा पदवीधर नोंदणी प्रमुख अविनाश देव, वर्धा जिल्हा पदवीधर सह नोंदणी प्रमुख अतुल तराळे, वर्धा नप उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, आर.पी.आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, अजय वानखेडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष न करता प्रत्येक पदवीधरापर्यंत पोहोचत त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. माजी खासदार रामदास तडस यांनी कार्यकर्त्यांनी बुथ निहाय नियोजन करून मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष गाते यांनी कोहळे यांचा विजय करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. आपले नियोजन पुर्ण आहे. आपण नोंदणी अर्ज भरून घेण्यात आघाडीवर आहोत. आता ते मतदानात उतरवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे गाते यांनी सांगितले. यावेळी विजय आगलावे यांनीही कोहळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गफाट यांनीही निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला. उमेदवार कोहळे यांनी वर्धा जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीवर आशीवार्द आहे. जिल्ह्याने नोंदणी मोठ्या प्रमाणात केली. पदवीधारांचे प्रश्न सोडविण्याची ताकद फत भाजपा महायुती सरकारमध्येच आहे. मतदार आपल्या बाजूने भकमपणे उभा असल्याचे सांगून जास्तीत संख्येने प्रथम क्रमांकाचे मत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन कोहळे यांनी केले.