दुर्गापूजा मंडपाबाहेर भरधाव कारने सात जणांना उडवले

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
बलरामपूर,
Car hits person outside Durga Puja pandal उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दुर्गापूजेच्या मंडपाबाहेर घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री उशिरा चिरगहियान बेलहा गावात ही घटना घडली. मंडपाबाहेर पडद्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी जमलेल्या भाविकांना सिद्धार्थनगरच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
 
 

a24354565678 
 
पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मनोज सिंग (४०), गणेश (३५) आणि पटेश्वरी (५०) यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू असून, छेदी राम (४५) आणि डब्ल्यू (३५) या दोघांना पुढील उपचारांसाठी बहराइच येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर बलरामपूर येथील जिल्हा मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
 
शहर पोलीस अधिकारी अभिषेक सिंग यांनी सांगितले की, अंधारामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेला होता. मात्र, पोलिसांनी परिसरात बॅरिकेड्स लावून बंदोबस्त वाढवल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, जखमींवरील उपचारांसह पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.