महाकालीच्या दर्शनाला निघाला, वाटेत बिबट्याचा हल्ला!

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur-leopard-attackचंद्रपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील महाकालीच्या दर्शनासाठी कुटुंबासोबत येत असलेल्या 9 वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातल्याची घटना घडली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री उशिरा बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील विसापूर परिसरात ही घटना घडली असून कार्तिक जाधव असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव असून तो हैदराबादचा रहिवाशी असल्याची माहिती आहे.
 
lepard 
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कार्तिक जाधव हा आपल्या आत्याच्या घरी बल्लारपूर येथे आला होता. नवरात्रोत्सवानिमित्त अनेक जण रात्री पायदळ प्रवास करून चंद्रपूरच्या महाकालीला दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे हा मुलगा देखील आपल्या कुटुंबासोबत महाकालीच्या दर्शनाला येत होता. मात्र विसापूर जवळ अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने कार्तिकला जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने भिंतीवरून उडी मारताना मुलाला सोडून दिले. पोलीस आणि वन विभागाने शोध घेतल्यावर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत मुलगा जवळच आढळून आला असून त्याला सध्या चंद्रपूरचा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून ऐन रहदारीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.