दीक्षाभूमीवरील मनपाच्या नियंत्रण कक्षाचे लोकार्पण

क्यू आर कोड स्कॅन करताच मिळणार संपूर्ण माहिती

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
नागपूर,
deekshabhoomi-digital-guide७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमी वर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या सोयी सुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा डिजिटल स्वरूपात माहिती पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मदत कक्षात लावण्यात आलेल्या क्यू आर कोड स्कॅन करताच मिळणार संपूर्ण माहिती मोबाईल फोन वर उपलब्ध होणार आहे.
 

dfhdfh
 
नियंत्रण कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ विपीन, सह पोलिस आयुक्त श्री.नवीनचंद्र रेड्डी, मनपाच्या झोन सभापती श्रीमती तारा यादव, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम,मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री विजय गुरुबक्षाणी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त श्री धनंजय जाधव, श्री प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, श्री राजेंद्र राठोड, उपअभियंता श्री. राजीव गौतम, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील कांबळे, उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे, कर विभागाचे श्री. जितेंद्र तोमर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी तर आभार अतिरिक्त आयुक्त श्री मिलिंद मेश्राम यांनी व्यक्त केले.
 
यावर्षी ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाकरीता दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांकरीता नागपूर महानगरपालिकेद्वारा दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सांयकाळ पासून ते गुरूवार २२ ऑक्टोबर सायंकाळ पर्यंत मुलभुत व अत्यावश्यक सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. दीक्षाभूमी परिसराच्या ठिकाणी व सभोवताल येथे एकूण १०५५ शौचालयाच्या सिटस् तसेच अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी १८० शौचालयाच्या सिटस् व बेझनबाग व उंटखाना मैदानात ४० शौचालयाच्या सिटस् अशा एकूण १२८५ शौचालयाच्या सिटस् उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यात महिला व पुरूषांकीरता वेगवेगळे १४० स्नानगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हाथ, चेहरा व पाय धुण्याकरीता ५० वॉश बेसिंग ची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 
 
पिण्याची पाण्याची व्यवस्थेकरीता रस्त्यावर १२० नळांची व्यवस्था तसेच प्रत्येक निवारा केंद्रावर पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे.अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नागपूर महानगरपालिकेद्वारे ४४ स्थायी सीसीटीव्ही कॅमेरे व १६ अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्थेकरीता पोलिस विभागास मदत करण्यात येत आहे. परिवहन व्यवस्थेकरीता काचीपुरा चौकात म.न.पा. परिवहन विभागाचे नियंत्रण कक्ष तयार करून उक्त नियंत्रण कक्षातून अनुयायांकरीता प्रवासाकरीता १६० आपली बसेसच्या ई बसेसची व्यवस्था केलेली आहे. स्वास्थ व्यवस्थेकरीता मनपाद वारे दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या चौकामध्ये आरोग्य सहाय्यता केंद्र, रुग्णवाहिका तैनात केलेले आहे. आपत्ती व्यवस्थापने अंतर्गत अग्निशमन विभागाचे अग्निशमन दल तैनात करण्यात आलेले आहे.
 
आकस्मित व्यवस्था
पावसाची शक्यता असल्याने दीक्षाभूमी परिसराच्या आजुबाजुच्या क्षेत्रातील नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या ८ शाळा, इमारती तसेच इतर खाजगी संस्थेच्या जवळपास ४० इमारती अधिगृहन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून पावसाच्या स्थितीत अनुयायांची उक्त इमारतीमध्ये राहणेची सोय करण्यात येईल.या सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणेकरीता नागपूर महानगरपालिकेचे एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेले आहे.
 
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
1)दीक्षाभूमी अग्निशमन व आपत्कालीन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
-0712-2220030
2) नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्ष अण्णाभाऊ साठे चौक -
0712-2220029
..