नागपूर,
dr. bharti gore स्त्री ही सृजनशक्तीचे प्रतीक असून कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीत तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. समर्थ स्त्री, समर्थ कुटुंब आणि सशक्त समाज हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे सशक्त स्त्री हीच सशक्त समाजाचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. भारती गोरे यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सशक्त नारी सशक्त समाज’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या ,समर्थ स्त्रीच्या योगदानातूनच सशक्त कुटुंब आणि समाजाची निर्मिती होते. पराक्रमासोबतच कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी त्याग करण्याची तिची तयारी हेही तिच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.राजमाता जिजाऊसाहेब यांच्याप्रमाणे माता ध्येयनिष्ठ असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडू शकते, असे त्या म्हणाल्या. ज्ञान, सन्मान आणि सामर्थ्याच्या बळावर भारतीय स्त्रीने जागतिक स्तरावर आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, असेही डॉ. गोरे यांनी नमूद केले.
सौजन्य:लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र