शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य : एकनाथ शिंदे

महायुतीच्या उमेदवारासाठी सभा

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
अमरावती,
eknath shinde महयुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक हा माणूस काम करणारा आहे. त्यांना विजयी करून दिवाळीपूर्वी आपल्याला फटाके फोडायचे आहे. शिक्षकांप्रती आम्ही संवेदनशील आहोत. जुनी पेन्शचा प्रश्न असो की टिईटीचा शिक्षकांचे सर्वच प्रश्न निकाली काढले जाईल. ती जबाबदारी माझी आहे. आम्ही जो बोलतो ते करतो. विरोधक अराजकता पसरविण्याचे काम करीत आहे. त्याकडे दुर्लक्ष करा आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 

eknath shinde promises to prioritize teachers’ issues at campaign rally for kiran sarnaik in amravati 
महायुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ रविवारी सिपना महाविद्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसुळ, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, खा. अनिल बोंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड, आ. उमेश यावलकर, राष्ट्रवादीचे आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, जगदीश गुप्ता यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
खा. बोंडे म्हणाले, महायुती एक दिलाने, एकeknath shinde  मताने सरनाईक यांचे काम करत आहे. आपली खरी लढाई काँग्रेस सोबत आहे. ते शिक्षकांना धमक्या देत आहे. ते मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत आहेत. काँग्रेसची दादागिरी थांबावली पाहिजे. स्वच्छ वातावरणात निवडणूक व्हावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आ. खोडके म्हणाले, किरण सरनाईक यांनी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकेने मांडले. सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार विजयी होणे हे शिक्षकांच्या फायद्याचे ठरणार असल्याने सरनाईक यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. किरण सरनाईक यांनी प्रास्ताविकात शिक्षकांच्या प्रश्न मांडले. सभेला मोठ्या संख्येने शिक्षक व कार्यकर्ते हजर होते.

एकनाथ शिंदे यांची शिष्टाई
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाने प्रीती रेवणे यांची उमेदवारी दाखल केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. रवि राणा यांना सदर उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली होती. त्याला मान देऊन रेवणे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. आज एकनाथ शिंदे शिष्टाई म्हणून युवा स्वाभिमानच्या कार्यालयात गेले आणि सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून सरनाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा नेत्या नवनीत राणा व अन्य नेते मंडळी हजर होती. तत्पूर्वी शिंदे यांनी अंबा व एकविरा देवीचे दर्शन घेतले.