महागाईविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो जणांना अटक

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |

युरोप,
france-italy-protestsयुरोपमधील लोक महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. विशेषतः इटली आणि फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी दुकाने लुटली आणि वाहने व इतर मालमत्ता जाळून टाकली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे वापरावे लागले. फ्रान्समध्ये पोलिसांनी किमान २७२ जणांना अटक केली, तर इटलीतील मिलान शहरात सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
 

youpope
 
शनिवारी इटलीतील मिलान शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर दंगलखोरांनी दुकाने लुटली आणि मालमत्तांना आग लावली. या हिंसाचारामुळे पियाझा डेल डुओमो चौक आणि उच्चभ्रू दुकानांची बाजारपेठ ओस पडली, जिथे सहसा मोठ्या संख्येने खरेदीदार येतात. युद्ध आणि वाढत्या महागाईविरोधात विविध ठिकाणी निघालेले मोर्चे शांततेत सुरू झाले, परंतु नंतर मुखवटा घातलेल्या आंदोलकांनी दंगल नियंत्रण पोलिसांवर दगड आणि इतर वस्तू फेकल्या. या घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कॅराबिनेरी पोलिसांचे एक वाहन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर केला.
 
 
लाप्रेस या वृत्तसंस्थेनुसार, किमान दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आणि अनेक अल्पवयीन मुलांसह सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी या हिंसाचाराचा निषेध केला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आंदोलन करणे हा हक्क आहे, पण शहरांना आग लावणे नाही. "आंदोलन करणे हा हक्क आहे. तुमच्या शहरांना आग लावणे नाही," असे त्यांनी लिहिले. त्यांनी अशा "उपद्रवी लोकांचा" उल्लेख केला, जे आंदोलनाचा फायदा घेऊन गोंधळ पसरवतात, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात आणि संपूर्ण शहरांना ओलीस ठेवतात. मिलानचे महापौर ज्युसेप्पे सेला म्हणाले, "कायदा अंमलबजावणी करणाऱ्यांविरुद्ध हिंसाचार करणे आणि शहराचे मोठे नुकसान करणे समर्थनीय नाही."