अरजित मोरेच्या नवकल्पनेला मुंबईत विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक !

गटारातील कचरा व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
वाशीम,
waste-management-in-drains वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावचा विद्यार्थी अरजित अमोल मोरे याने मुंबईतील विज्ञान प्रदर्शनात आपल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई उत्तर विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात अरजितच्या ‘नाली संरक्षण जाळी, सांडपाणी कचरा कोंडणारा पिंजरा, वनस्पती सर्वेक्षण’ या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले व १९९९ पासून मानाचा समजला जाणारा भाऊराव चेम्बुरकर उत्कृष्ठ नवेन्मेश फिरता पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
 
 
waste-management-in-drains
 
स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, चेंबूर, मुंबई येथे शिक्षण घेणार्‍या अरजितने गटारामध्ये साचणारा कचरा रोखणे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या प्रकल्पातील नाली संरक्षण ही संकल्पना रस्त्याच्या कडेला असलेल्या पावसाच्या पाण्याच्या गटारांमध्ये प्लास्टिक, पाने आणि इतर घनकचरा जाण्यापासून रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. डशुरसश उरसश ही संकल्पना उघड्या नाल्यांमधील तरंगता कचरा अडवून तो सहजपणे बाहेर काढण्यास मदत करते, तसेच पाण्याचा प्रवाह सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरते.या प्रकल्पात सांडपाणी कचरा कोंडणारा पिंजरा हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाइल अ‍ॅप्लिकेशनही समाविष्ट आहे.
 
 
या अ‍ॅपच्या मदतीने वनस्पतींची छायाचित्रांवरून ओळख पटवणे आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित संभाव्य समस्या तपासण्यास मदत होते. या प्रकल्पाच्या सादरीकरणात अमोघ प्रसाद अठल्ये आणि प्रजीत खाडे यांनी अरजितला सहकार्य केले.अरजितने यापूर्वीही आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रुची दाखवली आहे. त्याच्या या संकल्पनेवर आधारित संशोधन लेख नोव्हेंबर २०२५ मध्ये इंटरनॅशनल जनरल सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. मुंगळा गावातील या विद्यार्थ्याच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचा अरजितचा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.