भार्गवला जलतरणात सुवर्णयश

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Inter-school Swimming Competition दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथे आयोजित ‘AQUA QUEST – The Golden Lane Challenge’ या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थी भार्गव तभाने याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
 
 
mona
 
 
 
अंडर-१० मुलांच्या २५ मीटर जलतरण प्रकारात भार्गवने ब्रेस्टस्ट्रोकमध्ये २४.०२९ सेकंद, बॅकस्ट्रोकमध्ये २३.५९१ सेकंद आणि बटरफ्लाय प्रकारात २२.५२८ सेकंद अशी उल्लेखनीय वेळ नोंदवली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला पदक, प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.भार्गवच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुल मेहता, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे तसेच शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले.
सौजन्य: निकिता कायरकर,संपर्क मित्र