नागपूर,
Lalita Panchami, Bajaj Nagar ललिता पंचमीनिमित्त बजाजनगर येथील श्रीराम मंदिरात किशोरवयीन कौमुदी साल्पेकर हिचे ‘नवविधा भक्ती’ या विषयावर कीर्तन संपन्न झाले. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब साल्पेकर यांचा कीर्तनाचा वारसा त्यांची नातवंडे कौमुदी आणि राघव पुढे नेत आहेत.
अवघ्या १५ वर्षांच्या कौमुदीने बालसुलभ कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून भाविकांना नवविधा भक्तीचे महत्त्व समजावून सांगितले. तिचा भाऊ राघव यानेही कीर्तनातील दोन प्रसंग सादर करून आपल्या अभ्यासाची चुणूक दाखवली. बालवयातच मुलांना भारतीय संस्कृतीचे संस्कार मिळत असल्याने हिंदू धर्माचे भविष्य उज्ज्वल आहे, असे गौरवोद्गार प्रफुल्ल माटेगावकर यांनी काढले.कीर्तनाला तबल्यावर गौरंग सरमोकादम आणि संवादिनीवर मृणाल तेलरांधे यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी प्रतिमा माटेगावकर आणि रेणुका मुदलियार यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक उपस्थित होते.
सौजन्य:प्रतिमा माटेगावकर,संपर्क मित्र