नागपूर,
Lions Club of Nagpur मा इरा हीलिंग्ज आणि लायन्स क्लब ऑफ नागपूर मेट्रोपॉलिटन यांच्या संयुक्त विद्यमाने मातृसेवा संघ, नागपूर येथील विशेष मुलांसाठी साऊंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.मा इरा हीलिंग्ज च्या संस्थापक,डीसी योग ध्यान आणि लायन्स क्लबच्या सदस्य पियू लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. ध्वनी, संगीत आणि ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक शांतता, सकारात्मकता आणि आनंदाचा अनुभव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या सत्रात शाळेच्या प्राचार्या मृणालिनी मॅडम यांच्यासह शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मा इरा हीलिंग्ज चे सारंग खोडे आणि अपूर्वा खोडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.
सौजन्य:पियू लाहोरी,संपर्क मित्र