नवरात्रीनिमित्त भजन सोहळा

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Navaratri नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कल्पना वारंशीवार यांच्या घरी ‘मुक्तांगण’ सख्यांच्या उपस्थितीत भक्तिमय भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आदिशक्तीच्या स्तवनाने आणि ‘अयि गिरिनंदिनी’ या स्तोत्राने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर देवीची विविध पदे, स्तोत्रे आणि भजने सादर करण्यात आली. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या सुरेल मैफिलीने घरातील वातावरण देवीमय झाले.

56 
 
 
भजनांची सांगता भैरवीने झाली. त्यानंतर देवीची आरती आणि प्रसादवितरणाने या मंगल सोहळ्याची सांगता करण्यात आली. सख्यांच्या प्रेमळ सहवासाने आणि सुरेल भक्तिगीतांनी परिसरात आनंददायी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले. देवीची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो आणि सर्वांना भक्तिरसात चिंब होण्याचे भाग्य लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.या भजन सोहळ्यात रंजना ढोले, गीता चिकेरूर, शीला जोशी, वंदना देशपांडे, संध्या देशकर, माधुरी मुटे, वर्षा देशपांडे, अपर्णा कुलकर्णी आणि अंजली गव्हाणे या सख्यांनी सहभाग घेतला.
सौजन्य:कल्पना वाराणाशिवार,संपर्क मित्र