नागपूर,
Podar Prep Navratri Festival पोदार प्रेपमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, चित्रकला, संगीत आणि बाहुल्यांच्या खेळांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विशेष पेन्सिल समारंभात मुलांना सजवलेल्या पेन्सिली भेट देण्यात आल्या. तसेच पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या वापराची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाची संकल्पना संचालिका मिस स्वाती पोपट वस्त यांची होती. सेंटर हेड मिस मोना सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला.
सौजन्य:सोनाली गलघाटे,संपर्क मित्र