वर्धा
rare blue जिल्ह्याच्या जैवविविधतेमध्ये आणि पक्षीवैभवाच्या इतिहासात एक अत्यंत मानाचा तुरा रोवला गेला आहे. आर्वी तालुयातील लोअर वर्धा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात ‘ब्ल्यू-चीड बी-ईटर’ या अत्यंत आकर्षक आणि दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्याची वर्धा जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच अभ्यासू पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्याचे अचूक निरीक्षण करून त्यांना छायाचित्रे कॅमेर्यात कैद केले.
आर्वी तालुयातील लोअर वर्धा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, विस्तीर्ण पाणथळ जागा आणि सभोवतालचा घनदाट नैसर्गिक अधिवास विविध स्थानिक व परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे. याच परिसरात सातत्याने निरीक्षण करत असताना डॉ. मनीष ठाकरे, शुभम गिरी, डॉ. सफल पाटील, आनंद मोहळ आणि शांतनू बोरवार या पक्षीनिरीक्षकांच्या चमूला ब्ल्यू-चीड बी-ईटर हा देखणा पक्षी आढळून आला. त्यांनी केवळ पक्षी पाहिलाच नाही तर त्याची ओळख पटवून देणारी वैशिष्ट्ये, नोंदीची तारीख आणि ठिकाण, यासह शास्त्रीय दस्तऐवजीकरण केले आहे.
शास्त्रीय भाषेत ‘मेरोप्स पर्सीकस’ म्हणून rare blue ओळखला जाणारा हा पक्षी बी-ईटर (कीटकभक्षी) कुळातील आहे. त्याचा आकर्षक हिरवट शरीररंग, डोळ्यांखाली असणारा वैशिष्ट्यपूर्ण निळसर गाल (ब्ल्यू-चीक) आणि लांबट अणकुचीदार चोच यामुळे तो पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. हवेत उडणार्या कीटकांची, विशेषत: मधमाश्या आणि गांधीलमाश्यांची हवेतल्या हवेत अचूक शिकार करण्यात हा पक्षी पटाईत असतो. एखाद्या परिसरात या कीटकभक्षी पक्ष्याची उपस्थिती असणे, हे त्या भागातील उत्तम पर्यावरणीय आरोग्याचे लक्षण मानले जाते.