ध्यान-प्रार्थनेतून तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj चंद्रनगर येथील तुषार मोतीकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि स्व. वसंतबाबा मोतीकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

mehar 
 
 
यावेळी ग्रामस्वच्छता, सामुदायिक ध्यानसाधना, भजनसंध्या, ग्रामगीता पठण आणि प्रबोधनपर कार्यक्रम झाले. भाऊराव तायवाडे दादा यांच्या भजनगायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. ग्रामगीता रत्न बाळकृष्ण पाचभाई यांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांवर मात करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि भजनाचे महत्त्व विशद केले.तुषार व कोमल मोतीकर या नवदाम्पत्याच्या हस्ते अधिष्ठान व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शेवटी मौन श्रद्धांजली अर्पण करून आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. संचालन दिलीप गाडगे यांनी केले, तर आभार मीरा मोतीकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक गुरुदेवभक्त उपस्थित होते.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र