वर्धा,
rss and rashtra sevika samiti हिंदू समाजाच्या पराक्रमाचे स्मरण, संघटनाचे बळ आणि शतिजागरणाचा सात्त्विक आविष्कार असलेल्या विजयादशमी उत्सवाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०१ वर्षे तर राष्ट्र सेविका समितीच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पृष्ठभूमीवर वर्धेत स्वतंत्र विजयादशमी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वर्धा नगरच्या वतीने रविवार, २५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेच्या प्रांगणात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे-पिसुळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचार विभागाचे अखिल भारतीय सदस्य मुकुल कानिटकर प्रमुख वते म्हणूनमार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वर्धा नगर संचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्र सेविका समिती, वर्धा नगरच्या वतीने शनिवार २४ रोजी सायंकाळी ५ वाजता केसरीमल कन्या शाळा येथे विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या उषा फाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असुन अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीतारामका प्रमुख वत्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त स्वयंसेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वर्धा नगर कार्यवाहिका स्मिता पांडे यांनी केले आहे.